Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar ) आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला आहे. तर या प्रस्तावाला पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आहे. सुनेत्रा पवारांना कोणती खाती मिळणार? अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाची खातेही होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. Sunetra Pawar सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते. आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील. इतर कुणाचाही शपथविधी होणार नाही अशी माहिती मिळत आहे.