कुरकुंभ -दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाऊनच्या काळात अनेक बेरोजगार कामगारांच्या हाताला काम मिळत असल्याने परिसरातील कामगारांची आर्थिक घडी बसण्यासाठी भर पडली आहे. तीन महिन्यांत होरपळणाऱ्या घटकांना कंपन्यांनी मदतीचा हातभार लावला आहे. यामध्ये 100 कंपन्यामध्ये 10 हजार कामगारांना रोजगार मिळाला आहे.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच बंद असल्याने सर्व छोटे-मोठे व्यवसाय क्षेत्र ठप्प झाले. करोनामुळे अनेकांना बेरोजगार लागले आहे. लॉकडाऊनमुळे काही दिवसांपासून अनेकांचे रोजगार गेले. त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहेत. हजारो कामगारांचे स्थलांतर झाले आहे. शासनाने नियम व अटी शर्तीच्या अधीन राहून कंपन्या सुरू करण्यास मान्यता दिल्या आहेत.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील सध्या 100 पेक्षा जास्त कंपन्या सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगारवाटा निर्माण झाल्या आहेत. कुरकुंभ एमआयडीसीमधील सध्या ज्या काही कंपन्या सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्रात आठ ते दहा हजार कामगार काम करीत आहेत. कामगारही सूचनांचे पालन करीत आहेत. काही महिन्यांत काही कंपन्या बंद होत्या. त्यामुळे उद्योगाची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. मात्र, सध्या कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू झाल्याने हातबंद कामाला कंपन्यांचा आधार मिळाला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातील घटकांवर लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे. अनेकांचे हातचे काम गेले आहेत. यात रिक्षाचालक, चहा टपरीवाले, हॉटेल कामगार आदी क्षेत्रातील हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे काम गेले होते. अनेकांना कामे मिळत नव्हती. कंपनीचे संचालक कृष्णकुमार बुब यांच्या निर्देशानुसार सर्वांनाच कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. दौंड तालुक्यामधून पुणे शहरात जे कामासाठी होते. ज्यांच्या लॉकडाऊमध्ये नोकऱ्या गेल्या आहेत, अशा लोकांना कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
– विठ्ठल थोरात, व्यवस्थापक, क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी कंपनी.
मागील काही दिवसांत करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बरेचजण आपल्या गावी आले होते. अशांना आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रोजगाराची संधी निर्माण करून दिल्या आहेत. हॉटेलमधील कामगार, ड्रायव्हर आदी गरजू लोकांना अजूनही कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे गरजू तरूणांनी आमच्याशी संपर्क साधावा.
-संदीप जगताप, स्थानिक ठेकेदार, कुरकुंभ, पांढरेवाडी.