पुणे जिल्हा | पिरंगुट येथे कमांडो प्रशिक्षण

पिरंगुट, (वार्ताहर) – येथील जय तुळजाभवानी ट्रस्ट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी यांच्या वतीने मुळशी तालुक्यातील तरुण तरुणींसाठी कमांडो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, दि. १८ ते शुक्रवार, दि. २४ या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये स्वसंरक्षण रायफल शूटिंग, आपत्ती व्यवस्थापन, प्रत्यक्ष मैदानावरील सराव, प्रथमोपचार अशा विविध बाबी शिकविल्या जाणार आहेत, तरुणांमध्ये शौर्य, धैर्य, साहस, देशभक्ती जागृत व्हावी. आजचे तरुण-तरुणी निर्भीड कणखर आणि स्वाभिमानी मनोवृत्तीची व्हावेत, यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे.
स्लाईड शोद्वारे माहितीपट तसेच सेनादलातील व प्रशासनातील संधी यावर देखील या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. रोज सकाळी सात ते सायंकाळी ७ यावेळी मध्ये हे शिबिर पार पडणार आहे. वय वर्षे १४ ते वय वर्ष २२ वयोगटातील इयत्ता ते इयत्ता आठवी ते बारावी आणि त्यावरील शिक्षण असलेल्या इच्छुक तरुण-तरुणीसाठी हे शिबिर आयोजित केले आहे.
घोटवडे फाटा येथील शिवकालीन श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात हे शिबिर पार पडणार आहे प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी विनोद पाटणकर तसेच रामदास पवळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





