“कम्फर्ट झोन हा तुमचा शत्रू”; रकुल प्रीत सिंगने शेअर केली खास पोस्ट

Rakul preet singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर देखील ती नेहमी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने एक मोटिवेशनल पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “प्रत्येकाला आपला कफ्मर्ट झोन हा कायमच चांगला वाटतो, पण कफ्मर्ट झोन कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. तुमचा कम्फर्ट झोन हा तुमचा शत्रू आहे. त्यामुळे तुमची कधीच प्रगती होऊ शकत नाही,” अशा आशयाची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सध्या रकुल प्रीत सिंग तिचा आगामी सिनेमा ‘मेरे हसबंड की बिवी’मुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. या चित्रपटात रकुलसह अभिनेता अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर हे कलाकार पाहायला मिळणार आहे. ‘मेरी हसबंड की बिवी’मध्ये कॉमेडी आणि धमाल पाहायला मिळणार आहे. Rakul preet singh |
View this post on Instagram
मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. तर जॅकी भगनानी आणि वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केलीय. 21 फेब्रुवारी 2025 ला हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. चाहतेही रकुलच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय ती ‘दे दे प्यार दे 2’, ‘इंडियन 3’ या चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:





