सध्या थिएटर्समध्ये जुने चित्रपट पुन्हा रि-रीलीज करण्यात येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. काही चित्रपट ज्यावेळी रिलीज झाले त्यावेळी चालले नाहीत, पण पुन्हा रि-रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटांना मिळत आहे. चांगल्या प्रकारची कमाई देखील रि-रीलीजनंतर अशा चित्रपटांनी केली आहे. याचे उदाहरण म्हणजे तुंबाड. हा चित्रपट ज्यावेळी रिलीज झाला. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा सौम्य प्रतिसाद मिळाला.
मात्र, तुंबाड पुन्हा थिएटर्समध्ये रिलीज केल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभला. सत्या, सनम तेरी कसम हे चित्रपट देखील रि-रीलीज करण्यात आले असून त्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच आता बॅालीबूडमधील कल्ट चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट थेएटर्समध्ये रि-रीलीज करण्यात येणार आहे.
अंदाज अपना अपना हा चित्रपट १९९२ साली थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला होता. अभिनेता आमिर आणि सलमान खान या जोडगोळीने या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखलून हसवलं होतं. तब्बल ३१ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा थिएटर्समध्ये रि-रिलीज करण्यात येत आहे.
या चित्रपटाने आमिर आणि सलमानला एक ओळख मिळवून दिली. तसेच अभिनेत्री रविना टंडन आणि करिष्मा कपूर यांच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. जेष्ठ अभिनेते परेश रावल यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.
..नेटकरी म्हणतात तेरे नाम रि-रीलीज करा
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि सलमान खान यांची जोडी ही ‘अंदाज अपना अपना’ मध्ये दिसली होती. जवळपास 31 वर्षांनंतर निर्माता-दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या कॉमेडी फिल्म ‘अंदाज अपना-अपना’ ची एक वेगळीच क्रेझ आहे. हा एक कल्ट सिनेमा आहे. या वर्षी एप्रिलमध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यांत सोशल मीडियावर ‘तेरे नाम’ या चित्रपटाच्या री-रिलिजची मागणी नेटकरी करत आहेत.