Nagar | आ. टिळेकर यांनी घेतले अहिल्यादेवी स्मारकाचे दर्शन

जामखेड (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी नवनिर्वाचित आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी सायंकाळी भेट देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. आमदार टिळेकर यांचा आमदार प्रा. राम शिंदे व शिंदे कुटुंबीयांनी यथोचित सन्मान करत स्वागत केले.
आमदार योगेश टिळेकर यांचे कर्जत तालुक्यातील राशिन, बेनवडी, कर्जत शहर, आंबीजळगाव तसेच जामखेड तालुक्यातील चोंडी, जवळा या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यांचा ठिकठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला.
आमदार टिळेकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे, शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे, पत्नी आशा शिंदे यांनीआ. टिळेकर यांचा यथोचित सन्मान करत सत्कार केला. यावेळी आमदार टिळेकर यांनी आ. शिंदे व त्यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांचे आशिर्वाद घेतले.
आमदार योगेश टिळेकर यांचे जामखेड तालुक्यात आगमन झाल्यानंतर जानखेड तालुका भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विष्णू गंभीरे, भाजपा तालुका सरचिटणीस पांडुरंग उबाळे, नगरसेवक डाॅ.ज्ञानेश्वर झेंडे, सोमनाथ पाचरणे, बापुराव ढवळे व चौंडी ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी, कोंभळीचे सरपंच राहुल गांगर्डे, भाजपा नेते संपत बावडकर, भाजपा कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, सरपंच नितीन खेतमाळीस, बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश शिंदे, विशाल भांडवलकर, अनिल उबाळे, दिनेश शिंदे, आलेश शिंदे, भाऊसाहेब राऊतसह आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. समाजातील सर्व घटकाला न्याय देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.





