Nagar | आ. संग्राम जगताप गुरुवारी अर्ज भरणार

नगर, (प्रतिनिधी)- माजी आमदार अरुण जगताप आता मुलासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ अरुण जगताप मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत.
त्यांनी मार्केटयार्डमधील व्यापार्यांशी संवाद साधून आ.जगताप यांनी विकास कामांचा माध्यमातून शहराचा केलेला विकास व झालेला कायापालट याची माहिती दिली.
उद्या गुरुवार दि. 24 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप उमेदवारी अर्ज भरणार आहे, अशी माहिती यावेळी अरुण जगताप यांनी दिली.
अरुण जगताप म्हणाले, गेल्या 10 वर्षात आमदार जगताप यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले कर्तव्य बजावत केलेल्या विकास कामांमुळे शहराच्या प्रलंबित समस्या सुटल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व आ. जगताप यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शहराच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून त्याद्वारे शहरात मोठी विकासकामे सुरु आहेत.
यावेळी सुभाष पोखरणा, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा, गोपाल मणियार, राजेंद्र चोपडा, अविनाश घुले, संजय चोपडा, प्रकाश भावनगरे, ज्ञानेश्वर रासकर, संजय ताथेड, राजू शेटीया, संजय लोढा, राजेंद्र बोथरा, तलक्षी सावला, रंगनाथ खेंडगे आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





