Colombia News : कोलंबियाच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला; 3 सैनिक ठार
कोलंबियाच्या (Colombia News) उत्तरेकडील लष्करी तळावर काल झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान ३ सैनिक ठार झाले आणि किमान १६ जण जखमी झाले आहेत.

Colombia News : कोलंबियाच्या (Colombia News) उत्तरेकडील लष्करी तळावर काल झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान ३ सैनिक ठार झाले आणि किमान १६ जण जखमी झाले आहेत. कोलंबियाच्या सैन्याच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
सॅन ल्युकास पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या सँटा रोजा जेल सुर या छोट्याशा गावामधील लष्करी तळावरचा हा ड्रोन हल्ला कोणी केला, हे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलेले नाही. पर्वतरांगाचा हा भूभाग सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. या भागावरील नियंत्रणासाठी गल्फ क्लॅन, नॅशनल लिबरेशन आर्मी आणि रिव्होल्युशनरी आर्म्ड पोर्सेस ऑफ कोलंबियाच्या (Colombia News) माजी सदस्यांच्या नेतृत्वाखालील अन्य छोट्या गटांमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे.
हा ड्रोन हल्ला करणारे कोठेही लपून राहू शकणार नाहीत, असे कोलंबियाचे अध्यक्ष अबेलार्दो डी ला एस्प्रिएला यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आमच्या प्रत्येक सैनिकावरच्या हल्ल्यामुळे कोलंबियाच्या (Colombia News) संरक्षणाचा आमचा निर्धार अधिकच समर्थ होतो आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. डी ला एस्प्रिएला यांनी ऑगस्टमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कोलंबियाच्या ग्रामीण भागातील हिंसाचार अधिक वाढला आहे.






