जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली !
Updated On:

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 या बॅचचे नवल किशोर राम हे (आयएएस) अधिकारी आहेत. 2 वर्षांपूर्वी त्यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या बदलीनंतर आता पुण्याचे पुढील जिल्हाधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





