Cockroach Janata Party : नव्या वादाला तोंड फुटणार? कॉकरोच जनता पार्टीचे ‘अभिजीत दिपके’ यांना जीवे मारण्याची धमकी; ‘ते’ स्क्रीनशॉट केले शेअर
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

Cockroach Janata Party – देशातील सर्वात मोठी डिजिटल आणि व्यंगात्मक राजकीय चळवळ असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्वतः दिपके यांनी सोशल मीडियावर ‘आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत’ असे लिहीत या संदर्भातील स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
वैचारिक मतभेदांमधून थेट जीवे मारण्याची धमकी देणे अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत सोशल मीडियावरील पाठीराख्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी सायबर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडे दिपके यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. (Cockroach Janata Party )

Cockroach Janata Party : नव्या वादाला तोंड फुटणार? कॉकरोच जनता पार्टीचे ‘अभिजीत दिपके’ यांना जीवे मारण्याची धमकी; ‘ते’ स्क्रीनशॉट केले शेअर
३० वर्षीय मराठी तरुण अभिजीत दिपके याने सुरू केलेल्या या डिजिटल चळवळीला अवघ्या तीन दिवसांत तब्बल २० लाखांहून अधिक लोकांचा पाठिंबा मिळाला असून, सध्या हा देशातील सर्वात मोठा व्हायरल ट्रेंड ठरला आहे. (Cockroach Janata Party )
एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी, काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. सरन्यायाधीशांच्या याच विधानाचा निषेध म्हणून आणि यावर व्यंग करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी या मोहिमेचा जन्म झाला. (Cockroach Janata Party)
काही प्रमुख राजकीय नेत्यांनीही या चळवळीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे, मात्र आता थेट जीवे मारण्याची धमकी आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.




