Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीच्या पुण्यातील आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
Cockroach Janata Party: गुरुवारी (11 जून) दुपारी 4 वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर आंदोलन होणार

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन होणार असल्याची घोषणा केली.
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पक्षाचे हे दुसरे आंदोलन आहे. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाने या आंदोलनाची घोषणा केली.
अटीसहित परवानगी देण्यात आली (Cockroach Janata Party)
याकरिता कॉकरोच जनता पार्टीने उद्या दिनांक 11 रोजी आंदोलन निदर्शन करण्यासाठी विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. अखेर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने अटीसहित परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता हे आंदोलन गुरुवारी (11 जून) दुपारी 4 वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर होणार असल्याचेही सांगण्यात आले.
पक्षाचे जंतर मंतरवर पहिले आंदोलन (Cockroach Janata Party)
कॉकरोच जनता पक्षाने सुरुवातीपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी (6 जून) जंतर मंतरवर आपले पहिले आंदोलन केले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आले.
याशिवाय, देशभरातील विद्यार्थी आणि प्रख्यात अभियंता, शिक्षण सुधारक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. Cockroach Janata Party:
या आंदोलनात शेकडो लोक, ज्यात बहुतांशी तरुण होते, सहभागी झाले होते. अनेकांनी कॉकरोच मुखवटे घातले होते आणि हातात फुले धरली होती. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनस्थळी जमले होते. दिल्लीतील या आंदोलनानंतर अभिजीत दीपक यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात कॉकरोच जनता पक्षाचे उद्या आंदोलन होणार आहे. ( Cockroach Janata Part)
हेही वाचा:
Peanut Butter: पीनट बटरचे ६ मोठे फायदे; मात्र अति सेवनाने वाढू शकतात आरोग्याच्या समस्या





