CM Vijay : लोकसभा जागांची संख्या जैसे थे ठेवावी; विजय यांची मोदींना पत्राद्वारे मागणी
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय (CM Vijay) यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. त्यामधून देशातील लोकसभेच्या ५४३ जागांची संख्या जैसे थे ठेवण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

CM Vijay : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय (CM Vijay) यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. त्यामधून देशातील लोकसभेच्या ५४३ जागांची संख्या जैसे थे ठेवण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
देशात मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया राबवण्यास केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. लोकसभेच्या जागा वाढवून महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा त्यामागील उद्देश आहे. मात्र, फेररचनेला तमिळनाडू आणि दक्षिणेतील इतर राज्यांमधून तीव्र विरोध होत आहे. त्या प्रक्रियेमुळे लोकसभेतील आपल्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण घटेल.
तसेच, राष्ट्रीय स्तरावरील आपले राजकीय महत्व कमी होईल, अशी धास्ती त्या राज्यांना वाटत आहे. त्यातून विजय (CM Vijay) यांनी नुकतीच तमिळनाडूतील सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली. त्यावर द्रमुक आणि अण्णाद्रमुक या विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. मात्र, राज्यातील टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष सहभागी झाले.
त्यामध्ये फेररचनेला विरोध दर्शवण्यात आला. तशाच स्वरूपाचा ठराव तमिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला. संबंधित ठरावातून लोकसभेच्या जागा कायमस्वरूपी ५४३ इतक्या ठेवण्याचे साकडे घालण्यात आले. त्या ठरावाचा उल्लेख विजय (CM Vijay) यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात केला. लोकसभा जागांची संख्या कायम ठेवण्यासाठी घटनादुरूस्ती करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.






