Indian Hockey Team : Asia Cup विजयानंतर भारतीय हॉकी संघ मालामाल, बिहार सरकारकडून प्रत्येक खेळाडूसाठी १० लाख रु. बक्षीस जाहीर

Prize announced for Indian hockey team : भारतीय पुरुष हॉकी संघाने बिहारच्या राजगीर येथे प्रथमच आयोजित हॉकी आशिया कप 2025 मध्ये दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभूत करत विजेतेपद पटकावले. या शानदार विजयानंतर बिहार सरकारने विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूसाठी 10 लाख रुपये आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी 5 लाख रुपये रोख बक्षिसाची घोषणा केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडिया मंच एक्सवर आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, “राजगीर येथील क्रीडा संकुलात प्रथमच आयोजित हॉकी एशिया कप 2025 मध्ये भारतीय हॉकी संघाने शानदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे संपूर्ण देशाला गौरव प्राप्त झाला आहे.” त्यांनी संघाला भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा देताना, “हा विजय देशासाठी अभिमानास्पद आहे,” असेही म्हटले.
राजगीर में अवस्थित राज्य खेल अकादमी-सह-बिहार खेल विश्वविद्यालय के परिसर में पहली बार आयोजित हीरो एशिया कप 2025 में भारतीय हॉकी टीम ने विलक्षण जीत दर्ज कर पूरे देश को गौरवान्वित किया है। हीरो एशिया कप 2025 जीतने वाली भारतीय हॉकी टीम के खिलाड़ियों एवं सहयोगी स्टाफ के उत्साहवर्द्धन…
— Nitish Kumar (@NitishKumar) September 8, 2025
हॉकी इंडियानेही जाहीर केले बक्षीस –
बिहार सरकारच्या घोषणेपूर्वी हॉकी इंडियानेही विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूसाठी 3 लाख रुपये आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी 1.5 लाख रुपये रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. या विजयासह भारताने 14 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या एफआयएच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
भारताचा चौथा आशिया कप विजय –
भारताने आपला पहिला हॉकी आशिया कप 2003 मध्ये मलेशियाच्या क्वालालंपूर येथे पाकिस्तानला 4-2 ने हरवून जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये चेन्नई येथे दक्षिण कोरियाला 7-2 ने पराभूत करत दुसऱ्यांदा किताब पटकावला. 2017 मध्ये ढाका येथे मलेशियाला 2-1 ने पराभव करत तिसरा किताब जिंकला. आता 2025 मध्ये राजगीर येथे दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभूत करत भारताने चौथा आशिया कप किताब आपल्या नावे केला. हा विजय भारतीय हॉकीच्या गौरवशाली इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय जोडणारा ठरला आहे.





