CM Eknath Shinde – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. अध्यक्ष नार्वेकर यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुनावणी घेतली होती. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी निकाल दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, विधानसभा अध्यक्षावर ठाकरे गटाचा दबाव असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. ते लोक शिवसेना पक्षाला प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून वापरत होते. परंतु असं करू शकत नाही. म्हणून हा मोठा झटका त्यांना मिळालेला आहे. हुकूमशाही पद्धतीने पार्टी चालवणाऱ्या लोकांना हा मोठा झटका देण्यात आलेला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा प्रभू श्रीरामांनी दिलेला आशीर्वाद आहे. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्या आधी या ठिकाणी निर्णय मिळाला. सर्व जनतेला न्याय मिळाला. निर्णय हा आपल्या सगळ्यांचा आहे. हे लोक आधीपासून वेगवेगळी विधानं करत होते. मुख्यमंत्री आज जाणार, परवा जाणार असं सारखं बोलत होते. परंतु मी अजूनपर्यंत कायम आहे, असंही शिंदे म्हणाले.