Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : "शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 'थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र' देण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. (Devendra Fadnavis)
यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कागलमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. (Devendra Fadnavis)
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून, ५६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. (Devendra Fadnavis)
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. (Devendra Fadnavis)
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळातील चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार या त्रिसूत्रीच्या आधारावर राज्य शासन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)
इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून
साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी, त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, त्याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना झाला आहे. साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी झिरो वेस्ट संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)






