पत्राला पत्राने उत्तर! शरद पवारांच्या भोजनाच्या आमंत्रणावर शिंदे, फडणवीस म्हणाले…

CM DCM in Baramati – अजित पवार यांनी शरद पवारयांच्या विरोधात भूमिका घेत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला होता. निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ अजित पवार गटाला बहाल केले आहे. त्यामुळे सध्या, अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना रंगला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीवर देखील दोन्ही पवार आपापला हक्क सांगणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
अशातच अजित पवार सत्ताधारी गटात गेल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बारामती येथे येणार आहेत. शनिवारी २ मार्चला हा दौरा होणार आहे. शरद पवार यांनी बारामती येथे येणाऱ्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या निवासस्थानी भोजनाचे आमंत्रण दिले होते. CM DCM in Baramati )
शरद पवार यांनी दिलेल्या आमंत्रणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अशातच आता याबाबत मोठी अपडेट आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या आमंत्रण पत्राला उत्तर दिले आहे.
शरद पवार यांचे भोजनाचे आमंत्रण दोन्ही नेत्यांनी नाकारले आहे. शनिवारी २ मार्चला बारामती दौऱ्यासह इतरही कार्यक्रम असल्याने भोजनासाठी येणे जमणार नाही असं पत्र दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांना पाठवले आहे. ( CM DCM in Baramati )
इतर महत्वाच्या बातम्या





