पद्मावती मंदिर परिसराची साफसफाई
Updated On:

चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या 15 दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पडिक व मोकळ्या जागेत गवत वाढले असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे, परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर चिंबळी येथील पद्मावती देवीच्या मंदिराच्या परिसरात साफसफाई व औषध फवारणी करून तळ्यातील हिरवेगार गवत काढण्यात आले.
आंबेठाण येथील महिंद्रा आय कंपनीच्या वतीने एक सामाजिक कार्य व उपक्रम राबविण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ बनकर यांनी सांगितले. यावेळी महिंद्रा कंपनीचे एच. आर. अनिल काला, चेनत भोजणे, वैभव खडसे, रमेश कारले, सोमनाथ मुसळे, एकनाथ मोरे, विश्वनाथ सोनवणे, यातल्या मळगोडे, सोमनाथ साळूंके, ज्ञानेश्वर औटी, स्वयाली भट्ट आदि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.





