CJP Protest : आम्ही 26 जुलैला जंतर-मंतरवरील आंदोलकांना चोपणार; ‘या’ संघटनेची मोठी घोषणा
वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' मधील गैरव्यवहार आणि पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची (CJP Protest) मागणी करत अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी' गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे.

CJP Protest : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मधील गैरव्यवहार आणि पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची (CJP Protest) मागणी करत अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे.
मात्र, आता या आंदोलनाला वादाचे मोठे वळण मिळाले असून एका हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलकांना थेट मारहाण करण्याची उघड धमकी दिली आहे. गाझियाबादमध्ये ‘हिंदू रक्षा दल’ नावाची संघटना चालवणारे पिंकी चौधरी यांनी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलकांना धडा शिकवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पिंकी चौधरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत ही धमकी दिली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आंदोलकांवर (CJP Protest) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
चौधरी यांच्या मते, जंतर-मंतरवर जमलेले लोक सनातनविरोधी असून ते देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताची जगभरात बदनामी करण्यासाठीच हे आंदोलन सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Pinky of Hindu Raksha Dal says
“Will come with gang of jobless hindutva goons to Jantar Mantar and turn the protesters’ “posteriors” red..”He isn’t aware of the recent “Kambal Kuttai” given to Hindutva goons in Delhi and Bihar.
Give him a grand welcome Students pic.twitter.com/QyGd3BtYuh
— D (@Deb_livnletliv) July 24, 2026
याशिवाय, आंदोलनस्थळी काही तरुणी अश्लीलता पसरवत असून अत्यंत चुकीच्या भाषेचा वापर करत आहेत. तसेच भारतीय सैन्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात आहेत, असा आरोप चौधरी यांनी लावला आहे.
या आंदोलनात शरजील इमाम आणि उमर खालिद यांच्यासारख्या देशविरोधी विचारांच्या लोकांचा भरणा असल्याचे सांगत पिंकी चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला.
काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आझाद समाज पार्टीचे नेते व खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) यांचा उल्लेख करत त्यांनी थेट इशारा दिला आहे. चंद्रशेखर (रावण) स्वतःला खूप मोठे समजत असले, तरी त्यांची अक्कल ठिकाणावर आणण्याचे काम आम्ही करू आणि भारताची जगात कुठेही बदनामी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पिंकी चौधरी यांनी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पूर्ण ताकदीने (CJP Protest) जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांना चोप देण्याची थेट घोषणा केल्यामुळे आता २६ तारखेला दिल्लीत नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस काय पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






