CJP Protest : …आता CJP चं पुन्हा सर्वात मोठं आंदोलन, अभिजीत दीपकेंच्या घोषणेने देशात नवं वादळ
CJP Protest : नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आक्रमक झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आता पुन्हा एकदा देशभरात आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई अद्याप सुरू असल्याचा आरोप करत CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांचा छळ थांबवला नाही, तर देशभरात पुन्हा शांततापूर्ण आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (CJP Protest)
सीजेपीच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर आंदोलनाशी संबंधित दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू राहणार आहे. या आदेशानंतर पक्षाने नाराजी व्यक्त केली असून सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. (CJP Protest)
“विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिला तर आंदोलन अटळ”
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “विद्यार्थ्यांवरील पोलिसांची कारवाई सुरूच राहिली, तर कॉकरोच जनता पार्टी लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण आंदोलन सुरू करेल. सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे तात्काळ थांबवावे.” (CJP Protest)
सरकारवर आश्वासनभंगाचा आरोप
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील आणि आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही, असे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. (CJP Protest)
सीजेपीच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतरही विद्यार्थ्यांवरील कारवाई सुरू राहिल्यास सरकारविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलन छेडले जाईल. दरम्यान, विद्यार्थ्यांवरील कारवाई, न्यायालयीन प्रक्रिया आणि सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे देशभरातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (CJP Protest)
CJP Protest : आम्ही 26 जुलैला जंतर-मंतरवरील आंदोलकांना चोपणार; ‘या’ संघटनेची मोठी घोषणा






