Cincinnati Open 2024 : रागाच्या भरात केलेल्या ‘त्या’ कृतीसाठी अल्काराझने मागितली माफी, म्हणाला “अशा वेळी स्वत:वर..”

Cincinnati Open 2024 (Carlos Alcaraz vs Gael Monfils) :– सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत गेल मॉनफिल्सने कार्लोस अल्काराझला पराभूत केले होते. मॉनफिल्सकडून झालेल्या पराभवाने अल्काराझ भयंकर चिडला होता. चिडलेलया अल्काराझने मैदानात रॅकेट जमिनीवर आपटून तोडली होती. यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात आली होती. रविवारी अल्काराझने आपण केलेल्या कृतीसाठी माफी मागितली.
कार्लोस अल्काराझने आता पर्यंत चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराझला ३७ वर्षांच्या मॉनफिल्सकडून ४-६, ७-६ (७-५), ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर त्याने मैदानातच आपली रॉकेट तोडली होती.
Pido perdón porque mi actitud de ayer no fue correcta y es algo que no debería hacerse dentro de una pista. Soy humano, tenía acumulación de nervios dentro y a veces es muy complicado controlarse cuando estás con las pulsaciones tan altas. Trabajaré para que no vuelva a… pic.twitter.com/YR0dRJhTxX
— Carlos Alcaraz (@carlosalcaraz) August 17, 2024
त्याने केलेल्या कृतीसाठी अल्काराझने एक्सवर पोस्ट करताना माफी मागितली. तो म्हणाला, “मी जी कृती केली होती, ती योग्य नव्हती. अशा अतितटीच्या लढतीत विजयासाठी तुम्ही प्रयत्न करता असता, मात्र तुम्हाला अपशय येते, अशा वेळी स्वत:वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे” असे त्याने म्हटले आहे.
पुढे त्याने म्हटले आहे की,”गेल मॉनफिल्स विरुद्धचा सामना माझ्या कारकिर्दीत खेळाला गेलेला सर्वात वाईट सामना होता. त्यानंतर मैदानातच रॅकेट तोडण्याची कृती माझ्याकडून झाली. मी भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. झालेली गोष्ट मला विसरायची आहे.”
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कार्लोस अल्काराझने रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर अल्काराझ पहिलाच सामना खेळात होता. याच सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागल्याने तो संतप्त झाला आणि रॅकेट जमिनीवर आपटून तोडली होती.



