Cincinnati Open 2024 : सिनसिनाटी ओपन स्पर्धेचा विजेता जॅनिक सिनर ‘त्या’ आरोपातून दोषमुक्त…

Cincinnati Open 2024 :- सोमवारी सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेल्या अग्रमानांकित जॅनिक सिनरला उत्तेजकद्रव्य चाचणीमध्ये दोषी आढळल्याच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे.
मार्चमध्ये इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतदरम्यान जॅनिक सिनरची उत्तेजकद्रव्य चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये तो दोषी आढळला होता. यानंतर आठ दिवसांनी पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली होती. यामध्ये देखील दोषी असल्याचे दिसून आले होते. यामुळे जॅनिक सिनरचे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते. मात्र ही गोष्ट हेतुपुरस्पर करण्यात आले नसल्याचे सांगताना या निर्णयाच्या विरोधात त्याने लढा दिला होता. त्यामुळे त्याचे निलंबन मागे घेण्यात आले होते.
इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या वेळी सिनरचे फिजिओथेरपिस्ट जियाकोमो नाल्डी यांच्या हाताला जखम झाली होती. यावेळी त्यांनी मारलेल्या स्प्रेमध्ये बंदी असलेल्या औषधाचा वापर केला होता. त्यांनी स्प्रे मारलेला असतानाच जॅनिक सिनरवर उपचार केले होते. त्यामुळे बंदी घातलेले औषध जॅनिक सिनरच्या शरीरात देखील आढळून आले होते.
सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धा : जॅनिक सिनर, आर्यना सबालेन्का यांनी पटकावले विजेतेपद
या संदर्भात निकाल देताना जॅनिक सिनरला दोषमुक्त केले असले तरी मात्र इंडियन वेल्समधील उपांत्य फेरीतील रँकिंग गुण व बक्षिसाची रक्कम गमवावी लागणार आहे. या मोठ्या आव्हानात्मक आणि दुर्दैवी काळातून मी गेलो आहे. आता मात्र मी हा काळ मागे ठेवून आगामी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे जॅनिक सिनरने बोलताना सांगितले.





