तोंडात सिगारेट, डोळ्यांवर गॉगल…; शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटातील मोशन पोस्टर रिलीज

Deva First Poster | अभिनेता शाहिद कपूरचा ‘देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र त्यापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्याचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे.
‘देवा’च्या पोस्टरमध्ये शाहिद कपूर एका जबरदस्त अंदाजात दिसत आहे. पांढरा शर्ट, गळ्यात चेन आणि तोंडात सिगारेट असा शाहिदचा लूक पाहून चाहत्यांना कबीर सिंहची आठवण झाली. मोशन पोस्टरमध्ये सिगारेटमधून निघणारा धूर आणि त्यात शाहिदचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पोस्टरमध्ये शाहिदच्या मागे अमिताभ बच्चन यांचा ‘दीवार’ चित्रपटात दिसलेला लूक दाखवण्यात आला आहे. त्यामुळे यातील शाहिदचा रोल 1975 मध्ये आलेल्या ‘दीवार’ चित्रपटाचील बिग बींच्या भूमिकेप्रमाणेच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Deva First Poster |
View this post on Instagram
हे पोस्टर रिलीज करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लॉक आणि लोड देवा. 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये तुम्हा सर्वांना भेटू.’ दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज यांनी केले आहे. Deva First Poster |
यापूर्वी हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होणार होता. पण नंतर त्याची रिलीज डेट 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली. शाहीद कपूर याआधी क्रिती सेननसोबत ‘तेरी बातों में उल्झा जिया’ या चित्रपटात दिसला होता.
हेही वाचा:
शरद पवार यांच्यापुढे लोटांगण घालणार, दोन्ही पवारांनी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले नरहरी झिरवाळ?





