हातात सिगरेट अन् मित्रांसोबत गप्पा; तुरुंगात असलेल्या अभिनेता दर्शन थुगुदीपाला मिळतेय व्हीआयपी ट्रिटमेंट?

Darshan Thoogudeepa| कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा याला एका हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली. सध्या तो बेंगळुरूमधील परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र त्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यानंतर त्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल फोटोमध्ये दर्शन थूगुदीपा हा एका उद्यानात बसून शीतपेयसोबत सिगरेट पित असल्याचं दिसत आहे. त्याच्यासोबत काही कैदीही खुर्चीवर आरामात बसलेले दिसत आहेत. मात्र, तुरुंगात असताना अशा प्रकारे एखाद्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, हा फोटो तुरुंगाच्या आवारातील आहे की यापूर्वीचा आहे, याची पुष्टी झालेली नाही. Darshan Thoogudeepa|
दरम्यान, दर्शन सध्या त्याचा चाहता रेणुकास्वामीच्या हत्येच्या आरोपाखाली गेल्या अडीच महिन्यांपासून तुरुंगात आहे. ११ जूनला पोलिसांनी त्याला अटक केले होते. काही दिवसांपूर्वी दर्शनने घरचे जेवण मिळावे यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, त्याची याचिका बेंगळुरू न्यायालयाने फेटाळली. यातच आता या व्हायरल फोटोमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोवरून खळबळ उडाली आहे. मृत रेणुकास्वामी यांचे वडीलांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, ‘अशा गोष्टींमुळे सीबीआय तपास व्हायला हवा, अशी भावना निर्माण होत आहे. फोटोपाहून मला आश्चर्य वाटले. तो तुरुंगात आहे की नाही, याबाबत आम्हाला शंका आहे. तुरुंग हे तुरुंगच राहिले पाहिजे आणि अन्य कशातही बदलू नये.’ Darshan Thoogudeepa|
दर्शनवर रेणुकास्वामीची हत्याचा आरोप
अभिनेत्री पवित्रा गौडा आणि त्याच्या काही मित्रांसह दर्शनवर त्याचाच चाहता रेणुकास्वामीचा छळ करून हत्या केल्याचा आरोप आहे. या संदर्भात त्याला, पवित्रा गौडा आणि इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. रेणुकास्वामी ९ जून रोजी बेंगळुरूमधील फ्लायओव्हरजवळ मृतावस्थेत सापडला होता. हत्येवेळी रेणुकास्वामीला काठीने मारहाण करुन त्याला विजेचे चटके दिल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केला होता. तसेच पोलिसांना मृताच्या कपड्यांवर दर्शन आणि पवित्रा गौडाच्या बोटांचे ठसेही सापडले आहेत.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : शिरूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच





