विंबल्डन पुरुष स्पर्धेसाठी सिझॅक पहिल्या महिला पंच

लंडन – यंदाच्या विंबल्डन स्पर्धेत पुरुषांची अंतिम लढतीसाठी प्रथमच मारिया सिझॅक या पंच म्हणून काम पाहणार असून, पुरुष सामन्यासाठी विंबल्डनच्या इतिहासात प्रथमच महिला पंचाची नियुक्ती करण्यात आली आहे. मारिया सिझॅक या 43 वर्षीय या क्रोएशियाच्या आहेत.
नोव्हाक जोकोविच आणि मॅट्टेओ बॅर्रेटिनी यांच्या दरम्यान होणाऱ्या अंतिम लढतीसाठी त्या चेअर पंच असणार आहेत .अशी माहिती ऑल इंग्लंड टेनिस क्लबने ही माहिती दिली.
यापूर्वी 2014 मध्ये पेट्रा क्विटोवा आणि युजीनी बौचार्ड यांच्यातील महिला अंतिम लढतीत सिझॅक चेअर पंच होत्या. त्यानंतर त्यांनी 2017मध्ये महिलांच्या दुहेरी अंतिम लढतीतही पंच म्हणून काम पाहिले आहे.
क्रोएशियाता झाग्रेब येथील रहिवासी असणाऱ्या सिझॅक यांनी आतापर्यंत सलग 15 विबंल्डन स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. या खेरीज त्यांनी अथेन्स, लंडन आणि रिओ ऑलिंपिक स्पर्धेतही महिलांच्या अंतिम लढतीत पंच म्हणून काम पाहिले आहे.





