‘चुकून बंदूक चालली…पण बाबांचा आशीर्वादामुळे …’ रिव्हॉल्व्हरच्या घटनेवर गोविंदाची हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया…

Govinda । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते गोविंदाला त्याची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी लागली. अभिनेता सध्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहे. गोविंदाचे सर्व चाहतेही त्याच्या बाबत सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहे. अशात आता खुद्द गोविंदाने त्याच्या सर्व चाहत्यांना त्याच्या तब्येतीचे लेटेस्ट अपडेट दिली आहे.
View this post on Instagram
गोविंदाने हॉस्पिटलमधून आरोग्यबाबत ऑडिओ सेंड करत सांगितले
गोविंदा म्हणाला, ‘मी आता धोक्याबाहेर आहे. चुकून गोळी सुटली. बाबांचा आशीर्वाद होता म्हणून मी यातून वाचलो, मी माझ्या डॉक्टरांचे आभार मानतो. माझ्या चाहत्यांचाही मी ऋणी आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या कृपेने चुकून मारण्यात आलेली गोळी मला फक्त स्पर्श करून गेली. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.’
गोविंदाला गोळी कशी लागली?
आज पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. अपघाताबाबत माहिती देताना गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा म्हणाले की, अभिनेता कोलकाता येथे जाण्याचा विचार करत होता. त्यांची पत्नी सुनीता आधीच कोलकात्यात होती. मात्र घरातून बाहेर पडण्यापूर्वी तो आपली लायसन्स रिव्हॉल्व्हर साफ करून केसमध्ये ठेवत होता. त्यानंतर त्याच्या हातातून बंदूक पडली आणि गोळीबारा झाल्यामुळे त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. गोविंदाच्या मॅनेजरने असेही सांगितले आहे की गोविंदाच्या गोळीबारानंतर अभिनेत्याने स्वत: त्याला फोन करून घटनेची माहिती दिली.
हे वाचले का ?
मोठी बातमी..! अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली,’गोळी’ नेमकं प्रकरण काय ?





