Govinda । बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेते ( शिंदे गट ) गोविंदाच्या पायाला त्याच्याच बंदुकीने गोळी लागली आहे. पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. मिळलेल्या माहितीनुसार, अभिनेता सकाळी कुठेतरी जायला निघाला होता. त्याच क्षणी चुकून फायरिंग झाल्यामुळे त्यांच्याच बंदुकीने त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. यानंतर गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलीस करत आहे संपूर्ण प्रकरणाचा तपास
पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या गोविंदाच्या पायातून खूप रक्त वाहत असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज मंगळवारी सकाळी घडली. पहाटे ४.४५ वाजता गोविंदा घराबाहेर पडण्याच्या तयारीत होता. बाहेर जाण्यापूर्वी गोविंदा त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत होता. मात्र चुकून त्याच्याच रिव्हॉल्वरचा मिस फायर झाला. यावेळी गोविंदाच्या गुडघ्यावर गोळी लागली आहे. जखमी अवस्थेत गोविंदाला क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर काडतूस पडल्याने हा अपघात झाला.
गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता
गोविंदाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून हा अपघात 4:45 वाजता कसा घडला याचा तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर काडतूस पडल्याने हा अपघात झाला. या घटनेबाबत रुग्णालयाने कोणतीही माहिती दिलेली नाही.
गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी एएनआयला सांगितले की,
गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर या प्रकरणात ठेवत असताना त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर निसटून खाली पडल आणि गोळीबार झाला. गोविंदाच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी त्याच्या पायाला लागली.