IND vs ENG : ख्रिस वोक्सचा कहर! पहिल्याच षटकात जैस्वाल-सुदर्शनची बत्ती गुल, ४२ वर्षानंतर पहिल्यांदाच घडलं असं

IND vs ENG Chris Woakes took 2 Wickets in 1st over : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यावर यजमान संघाने आपली पक्कड मजबूत केली. इंग्लंडने भारताला पहिल्या डावात ३५८ धावावर रोखल्यानंतर प्रत्युत्तरात ६६९ धावांचा डोंगर उभारत ३११ धावांची आघाडी घेतली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के देत जैस्वाल-सुदर्शनला तंबूत धाडले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात केला मोठा धमाका –
दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज ख्रिस वोक्सने मोठा धमाका केला. त्याने पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला भोपळाही फोडू दिला नाही. तो या डावात संघासाठी मजबूत सुरुवात करेल अशी अपेक्षा होती. पण विकेटची गळती इथेच थांबली नाही. वोक्सने पुढच्याच चेंडूवर साई सुदर्शनलाही झेलबाद केले, जो गोल्डन डकचा बळी ठरला. सलग दोन चेंडूंवर विकेट्स गमावल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला.
🧵 WICKETS THREAD 🧵
Catch every England wicket from Emirates Old Trafford as we seek series victory in Manchester 🇮🇳👇
— England Cricket (@englandcricket) July 26, 2025
४२ वर्षांनंतर पुन्हा झाली या प्रसंगाची पुनरावृत्ती –
Chris Woakes! 🔥
A heart-in-mouth moment for Joe Root who nearly fumbles… but the man of the hour holds on and we have our first!
🇮🇳 0️⃣-1️⃣ pic.twitter.com/Z0EMNiAMSt
— England Cricket (@englandcricket) July 26, 2025
यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या या खराब सुरुवातीने ४२ वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगाची पुनरानृत्ती झाली आहे. विशेष म्हणजे १९८३ नंतर प्रथमच भारतीय संघाने कसोटी सामन्याच्या एका डावात एकही धाव न करता दोन विकेट्स गमावल्या. यापूर्वी डिसेंबर १९८३ मध्ये चेन्नईत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने कसोटी सामन्यात पहिल्या दोन विकेट्स एकही धाव न करता गमावल्या होत्या. त्या डावात सुनील गावस्कर यांनी २३६ धावांची खेळी केली होती, आणि तो एकमेव प्रसंग होता, जेव्हा त्यांनी कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
हेही वाचा – IND vs ENG : ‘बुमराह लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार…’, भारताच्या माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
इंग्लंडकडे ३११ धावांची मजबूत आघाडी –
इंग्लंडचा पहिला डाव ६६९ धावांवर आटोपला. यामुळे यजमानांनी ३११ धावांची आघाडी घेतली. भारताने त्यांच्या पहिल्या डावात ३५८ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी शतकी खेळी केली, तर भारताकडून रवींद्र जडेजाने चार गडी बाद केले. चौथ्या दिवसाचा खेळ इंग्लंडच्या ७ बाद ५४४ धावांपासून सुरू झाला होता. पहिल्या सत्रात इंग्लंडने १२५ धावा जोडल्या आणि ६६९ धावांवर सर्वबाद झाला.





