क्रिस मार्टिनचा ‘जय श्रीराम’चा नारा; भारतीयांची माफीही मागितली, नेमकं कारण काय?

Coldplay | ‘कोल्डप्ले’ या आंतरराष्ट्रीय म्यूझिक बँडचा पहिला शो शनिवारी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये झाला. ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेचा प्रमुख गायक क्रिसमार्टिनने त्याच्या चाहत्यांचे मनापासून स्वागत केले. या कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यातील एका व्हिडिओमध्ये क्रिस मार्टिन त्याच्या चाहत्यांशी हिंदीत बोलताना दिसत आहे. तसेच ‘कोल्डप्ले’ बँडच्या गायकांनी ‘जय श्रीराम’चा नारा लगावला. त्याच्या या कृतीने त्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.
मार्टिन कॉन्सर्टमध्ये बोर्ड वाचत असताना त्याच्यावर ‘जय श्री राम’ लिहिलेले बॅनर दिसले. गायकाने ते वाचले आणि त्याचा अर्थ काय आहे हे विचारले. त्यावेळी तेथील लोकांचा उत्साह पाहून त्याने हे काहीतरी चांगले असावे, असे म्हंटले.
कॉन्सर्ट दरम्यान ख्रिस मार्टिन हिंदीत म्हणाला, ‘तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मुंबईत आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. पहिल्यांदाच आम्ही इतका मोठा शो करतोय. तुम्ही आमचं स्वागत करताय ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही ग्रेट ब्रिटनमध्ये राहणारे असलो तरी ब्रिटनद्वारे जी वाईट कामं करण्यात आली आहेत, त्यासाठी आम्हाला माफ केल्याबद्दल धन्यवाद,” असे म्हणत त्याने भारतीयांची माफीही मागितली. Coldplay |
View this post on Instagram
कॉन्सर्टच्या एका व्हिडिओमध्ये क्रिस ‘जय श्री राम’ म्हणतानाही दिसत आहे, त्यानंतर चाहत्यांनी जल्लोष सुरू केला आहे. हा कॉन्सर्ट कोल्डप्लेच्या ‘म्युझिक ऑफ द स्ट्रेंज वर्ल्ड टू’ चा भाग आहे. हा शो 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी मुंबईत होत आहे. याशिवाय 25 आणि 26 जानेवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही बँड परफॉर्म करणार आहे. Coldplay |
हेही वाचा:





