Param Sundari Movie Updates: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘परम सुंदरी’ चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच सिद्धार्थने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सिद्धार्थ आणि जान्हवीने केरळमध्ये परम सुंदरी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. सिद्धार्थने सेटवरील एक शानदार फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये बॅकवॉटरचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करत सिद्धार्थने ‘नमस्कारम केरळ’ असेही लिहिले.
View this post on Instagram
परम सुंदरी या रोमँटिक कॉमेडी-ड्रामाच्या माध्यमातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. चित्रपटाची कथा उत्तर भारतीय मुलगा (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि दक्षिण भारतीय मुलगी (जान्हवी कपूर) यांच्यातील प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा केरळमधील आहे. त्यामुळे शूटिंग देखील तेथेच सुरू आहे.
याआधी रिलीज केलेल्या मोशन पोस्टरमध्ये सिद्धार्थला उत्तर भारतीय तरूणाच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते. तर जान्हवी कपूरने पारंपारिक दाक्षिणात्य भारतीय पोशाख परिधान केला होता. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा हे करत आहे. तर मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती होत आहे. हा चित्रपट 25 जुलै 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.