China News : चीनने घेतली पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
चीनने (China News) आज आपल्या अण्वस्त्र सज्ज पाणबुडीतून एका लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. प्रशांत महासागरामध्ये घेतली गेलेली ही चाचणी यशस्वी झाल्याचे चीनच्या पीपल्स रिपब्लिक आर्मीच्या नौदलाने म्हटले आहे.

China News : चीनने (China News) आज आपल्या अण्वस्त्र सज्ज पाणबुडीतून एका लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. प्रशांत महासागरामध्ये घेतली गेलेली ही चाचणी यशस्वी झाल्याचे चीनच्या पीपल्स रिपब्लिक आर्मीच्या नौदलाने म्हटले आहे. चीनने घेतलेली ही क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे जपान आणि ऑस्ट्रेलियाला दिलेली एक तीव्र प्रतिक्रिया असल्याचे मानले जाते आहे.
दुपारी १२ वाजून एक मिनिटाने डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रावरून (China News) बनावट स्फोटके वाहून नेण्यात आली होती. प्रशांत महासागरामध्ये आगोदरच निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्याचा या क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला असेही पीपल्स रिपब्लिक आर्मीच्या नौदलाने म्हटले आहे. ही चाचणी पीएलए नौदलाच्या नियमित प्रशिक्षणाचा भाग होती. या चाचणी संदर्भात चीनने आजूबाजूच्या देशांना आगोदरच पूर्वकल्पना देन ठेवली होती.
आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय प्रथेला अनुसरूनच ही चाचणी घेण्यात आली होती. कोणत्याही एका विशिष्ट देशाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने ही चाचणी घेतली गेली नव्ह८ती, असेही पीएलए नौदलाने म्हटले आहे. मात्र या क्षेपणास्त्राचे नाव आणि त्याच्या मारक क्षमतेबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
कोणत्या पाणबुडीवरून या क्षेपणास्त्राची (China News) चाचणी घेतली गेली, हे देखील स्पष्ट केले गेलेले नाही. चीनकडन लष्करी सामर्थ्य खूप जास्त प्रमाणात वाढवले जात असल्याची टीका जपान आणि ऑस्ट्रेलियाने केली आहे.






