Chinese pastor released : अमेरिकेच्या धर्मगुरुची चीनमधील तुरुंगातून सुटका
चीनमधील तुरुंगात डांबण्यात आलेल्या एका ख्रिश्चन धर्मगुरुची सुटका करण्यात आली आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी चीन दौऱ्यादरम्यान या धर्मगुरुच्या सुटकेची मागणी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे केली होती.

Chinese pastor released – चीनमधील तुरुंगात डांबण्यात आलेल्या एका ख्रिश्चन धर्मगुरुची सुटका करण्यात आली आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी चीन दौऱ्यादरम्यान या धर्मगुरुच्या सुटकेची मागणी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी या धर्मगुरूची सुटका झाली आहे.
पास्टर एझरा जिन मिनग्री असे या धर्मगुरूचे नाव असून ते गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लॉस एंजेलिसला आले होते. जिन आणि भूमिगत झिऑन चर्चच्या इतर १७ नेत्यांना चीनमधील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या अटकेविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरून ओरड व्हायला लागल्यानंतर या प्रकरणाकडे ट्रम्प यांचे लक्ष गेले आणि त्यांनी जिनपिंग यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी हॉंगकॉंगमधील कार्यकर्ते जिमी लाय यांच्याही सुटकेची मागणी केली होती.
मात्र जिमी लाय यांची चीनने सुटका केलेली नाही. झिओन चर्च ही बिगर नोंदणीकृत आणि घरातच चालवल्या जाणाऱ्या चर्चची संघटना आहे. पण चीनमध्ये केवळ नोंदणीकृत चर्चलाच परवानगी असल्याने या चर्च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले होते.





