China Coronavirus Updates : चीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक; एकाच दिवसात विक्रमी नव्या रूग्णांची नोंद

बीजिंग – संपूर्ण जगात लॉकडाउन करायला लावणाऱ्या करोनाचा उगम ज्या चीनमध्ये झाला त्या देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बुधवारी एकाच दिवसात 31 हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार करोनाचा उगम झाल्यापासूनची चीनमधील ही एका दिवसातील विक्रमी संख्या आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सामूहिक चाचण्या, काही भागात लॉकडाउन, पर्यटनावर बंधने असे उपाय सुरू करण्यात आले आहेत. त्याच दरम्यान, करोनाच्या प्रसाराच्या मुद्द्यावरून येथील अॅपल कंपनीच्या कारखान्यात तेथील कामगार आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर चेंगझू शहरात पूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे.
केजरीवालांना ठार मारण्याचा कट, ‘या’ भाजप खासदारावर हत्येचा कट रचल्याचा आरोप
राजधानी बीजिंग येथेही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उद्याने, कार्यालये आणि शॉपिंग मॉलही बंद करण्यात आले आहेत. सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेल्या चाओयांग जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे.





