चिंब भिजलेले रूप सजलेले…! लाल रंगाच्या कॉटन साडीत खुललं ‘ऐश्वर्या नारकर’चं नैसर्गिक सौंदर्य

Updated On:
Photo 1

मुंबई – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच साध्या लुकमध्ये असते. मात्र याच साध्या लुकमधील साडीलुकसुद्धा प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे. नुकतंच तिने साडीमध्ये क्लासिक फोटोशुट केलं असून, या मादक लुकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहेत. खरंतर साडीलुकमध्ये ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे.

वयाची 50 वर्ष पार केल्यानंतरही ती तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली ऐश्वर्या तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेअर करत असते. ऐश्वर्या साडीसोबतच अनेकदा वेस्टर्न लूकमध्येही फोटो शेअर करत असते. मात्र, तिचा साडी लूक काही वेगळाच असतो.

अश्यातच आता पुन्हा एकदा अभिनेत्रीनं आपले साडीतील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून, तिचा बोल्ड अवतार पाहून फॅन्स पागल झाले आहेत. ऐश्वर्याने लाल साडीतील पाण्यात उभे राहून ओलेचिंब असेल भिजलेले फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोकडे पाहताना कोणताही वल्गरपणा नाही तर केवळ सौंदर्यच दिसून येत आहे.

सुंदरतेचे ऐश्वर्य लाभलेली ऐश्वर्या नारकर या लाल रंगाच्या कॉटन साडीमध्ये अधिक आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. तसेच, वेगवेगळ्या कपड्यांचे पॅच एकत्र करून डिझाईन केलेला हा ब्लाऊज लाल साडीवर परफेक्ट मॅच झालाय. कपाळावर नाजूकशी टिकली आणि नो मेकअप लुकमुळे ऐश्वर्याच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर पडलेली दिसून येत आहे.

दरम्यान, अभिनेत्रीचा तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला फॅन्स प्रचंड प्रेम देतात. असंख्य मालिका, चित्रपटांमध्ये काम करून ‘ऐश्वर्या नारकर’ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. निखळ हास्य आणि मनमोहक अदा यांमुळे ऐश्वर्या चाहत्यांची मनं जिंकत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना