दोन वर्षांखालील मुलांना टीव्ही पाहण्यास ‘बंदी’; स्वीडनमध्ये प्रत्येक वयाच्या मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

स्टॉकहोम आधुनिक काळात लहान मूल रडायला लागले तरीही त्याच्या हातात मोबाइल देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक देशात असाच अनुभाव येतो पण आता स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.
देशाच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या मते, स्क्रीनचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत असल्याने लहान मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजनपासून पूर्णपणे दूर ठेवले पाहिजे.मोबाइल, टीव्हीच्या अति वापरामुळे कौटुंबिक संवाद कमी झाला आहे.शारीरिक व्यायाम बंद झाला आहे.अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे ऑन-स्क्रीन वेळ कमी करण्याच्या या शिफारसी फक्त लहान मुलांसाठी नाहीत तर इतर वयोगटातील मुलांचास्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठीही धोरण आखले जात आहे .
एका पाहणीनुसार १३ ते १६ वयोगटातील स्वीडिश किशोरवयीन मुले शाळेबाहेर पडल्यानंतर दररोज सरासरी साडेसहा तास मोबाइल, टीव्हीवर घालवत आहेत. ८ तासांपेक्षा अधिक वेळ स्क्रीनवर अमेरिकेतील किशोरवयीन मुले घालवत आहेत.
याच पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्हीपासून दूर ठेवावे.दोन ते पाच वयोगटातील मुलांना दररोज एक तासापेक्षा जास्त स्क्रीन पाहण्यास देऊ नये.सहा ते बारा वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाइम दररोज एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित असावा.
तेरा ते अठरा वयोगटातील मुलांनी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त स्क्रीन वापरता कामा नये या नियमांचा त्यात समावेश आहे मार्गदर्शक तत्त्वे केवळ स्क्रीन टाइम कमी करण्याबद्दल नसून, सवयी बदलण्याबद्दलदेखील आहेत.झोपण्यापूर्वी फोन, टीव्ही पाहू नये तसेच रात्री फोन आणि टॅबलेट त्यांच्या मुलांच्या बेडरूममधून बाहेर ठेवावा, अशीही शिफारस सरकारने केली आहे.





