‘काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत, पण…’ ; महाकुंभातून योगींनी साधला विरोधकांवर निशाणा

Chief Minister Yogi Adityanath । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजच्या महाकुंभात सनातन धर्माबाबत विधान केले आहे. ते म्हणाले, “भारतात एकता आवश्यक आहे. जर भारत संकटात असेल तर याचा अर्थ सनातन धर्म संकटात आहे. जर संकट आले तर अनेक पंथ सुरक्षित वाटणार नाहीत.”
जितके सकारात्मक वातावरण आहे तितकेच आव्हा Chief Minister Yogi Adityanath ।
योगी आदित्यनाथ म्हणाले, “भारताची सनातन संस्कृती तलवारीच्या बळावर जगापर्यंत पोहोचली नाही तर तिच्या सौहार्दाच्या उपदेशाद्वारे पोहोचली. जितके सकारात्मक वातावरण आहे तितकेच आव्हाने देखील आहेत. लक्षात ठेवा, कोणत्याही धर्मात दोन गोष्टी असतात लक्षात ठेवावे. सनातन धर्म हा वडाचे झाड आहे, त्याची तुलना झुडुपाशी करू नका.” असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, जगात इतर पंथांच्या उपासना पद्धती असू शकतात पण धर्म एकच आहे आणि तो म्हणजे सनातन धर्म, हा मानवी धर्म आहे. ” असे त्यांनी यावेळी सांगितले.
म्हणून एकतेचा संदेश देणे आवश्यक Chief Minister Yogi Adityanath ।
योगी आदित्यनाथ म्हणाले, “पंतप्रधान असेही म्हणतात की कुंभमेळ्याचा संदेश असा आहे की केवळ एकताच देशाला एक ठेवेल. जर भारत सुरक्षित राहिला तर प्रत्येक धर्म आणि पंथ सुरक्षित राहील. जर भारत संकटाचा सामना करत असेल तर ते संकट सनातन धर्मावर येईल आणि जर सनातन धर्म समुदायावर संकट आले तर भारतातील कोणताही समुदाय सुरक्षित वाटणार नाही. संकट येऊ नये म्हणून एकतेचा संदेश देणे आवश्यक आहे.”
हेही वाचा
‘हिंमत असेल तर दाऊद इब्राहिमच्या …’, तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांची सरकारवर टीका
महाकुंभमेळ्यात पुन्हा आग; वाहनांंनी घेतला पेट; अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल





