मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाला त्यांचाच पक्षातील नेत्यांचा विरोध

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये 7 नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे बंगालमध्ये 23 ऐवजी 30 जिल्हे होणार आहे. ममता ज्या प्रचंड बहुमताने राज्यात पुन्हा निवडून आल्या आहेत ते पाहता त्यांच्या या निर्णयाला कोणाचा विरोध होण्याची शक्यता नव्हती. विरोधी पक्षांकडेही त्यांना आव्हान देण्याइतपत संख्याबळ नाही. मात्र तरीही ज्या जिल्ह्यांतून नवे जिल्हे तयार केले जाणार आहेत तेथील वातावरण तापत चालले आहे. केवळ सामान्य नागरिक नाही, तर खुद्द ममतांच्या पक्षातील नेत्यांचाही विरोध आहे. विशेषत: नादीया आणि मुर्शिदाबाद येथून विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. आमचे ऐतिहासिक महत्वच संपून जाईल व ओळख पुसली जाईल असा या लोकांचा आक्षेप आहे.
सरकारच्या योजनेनुसार नदियातून राणाघाट, मुर्शिदाबादमधून बहरामपूर आणि जंगीपुर, बंकुरामधून विष्णुपुर आणि इच्छामती, साउथ 24 परगणामधून सूंदरबन आदी जिल्हे तयार केले जाणार आहेत. नॉर्थ 24 परगणामधूनही एक जिल्हा तयार केला जाणार आहे मात्र त्याचे नाव अजुन ठरवण्यात आलेले नाही.
मुर्शिदाबाद आणि नादियाचे निवासी या प्रस्तावामुळे नाखुष आहेत. या दोन नावांची जगाने दखल घेतली आहे. ब्रिटन आणि ऑक्स्फर्डमध्येही त्याची नोंद आहे. असे असताना नाव बदलून नवे जिल्हे तयार करणे म्हणजे आमची ओळख पुसण्यासारखे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. इंग्रजाचा भारतातील प्रवेशच 18 व्या शतकात प्लासीच्या लढाईने झाला होता. ती मुर्शिदाबाद येथे झाले होती.
तीन शेतीविषयक कायद्यांनंतर आता शेतकरी संघटनांकडून अग्निपथ योजनेविरोधात एल्गार
हा भारताच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा आहे. तर नादीयाची ओळख 15 व्या शतकातील ऋषी चैतन्य महाप्रभू यांचे जन्मस्थान आणि शिक्षण केंद्र म्हणून आहे. त्यामुळे लोकांचा नव्या जिल्ह्यांना विरोध आहे व ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, पक्षाच्या बैठकीत ममता यांच्या पक्षाचे मुर्शिदाबाद येथील आमदारांनी ममतांना लोकांमधील नाराजीची माहिती देण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे म्हणणे पूर्ण होण्यापूर्वीच ममतांनी त्यांना टोकले. अद्याप केवळ प्रस्ताव आहे. निर्णय अजुन झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे दिल्लीत मोठे वक्तव्य, म्हणाले.. “याच आठवड्यात…”





