नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आजादी का अमृतमहोत्सव आणि निती आयोगाच्या बैठकीसाठी ते दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीत पोहोचताच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठे वक्तव्या केले आहे. याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल असे त्यांनी म्हंटले आहे.
पत्रकारांनी शिंदे यांना पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार का? असे विचारले असता मंत्रिमंडळ विस्ताराला कुठलाही अडथळा नाही, अडचण नाही. पुढच्या आठवड्यात कशाला याच आठवड्यात विस्तार होईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच माझ्या या दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी भंडाऱ्यातील महिलेवरील अत्याचारावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, कठोर कारवाई करण्यात येईल.