V.V. karmarkar : मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :- मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक,पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि.करमरकर यांच्या निधनाने क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून देणारा मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. pic.twitter.com/nIht6FVyJ3
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 6, 2023
मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वृत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. या अर्थाने ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/the-father-of-marathi-sports-journalism-lostvv-karmarkar-passed-away/
त्यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!





