PUNE: चांदणी चौक लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी? राजकीय चर्चांना उधाण

पुणे – पुणे शहरातील चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याचे म्हंटले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच कारणामुळे एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे म्हंटले जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी असल्याने ते तेथेच थांबणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांना चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. यावेळी पुणेकरांनी देखील त्यांच्याकडे वाहतूक कोंडीची समस्या मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील लवकरात लवकर पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. आता या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे. मात्र असे असतानाच मुख्यमंत्री या कार्यक्रमाला दांडी मारणार आहेत. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.





