Pune : ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमांतर्गत हजारो वारकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनी केला योग दिन साजरा

Devendra Fadnavis | Pune | देशभरात आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टम येथे योगाचे महत्व विशेद केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुण्यात वारकऱ्यांसमवेत वारकरी भक्तीयोग या कार्यक्रमाअंतर्गत योग दिन साजरा केला.
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑलम्पिक वीर खाशाबाज जाधव क्रीडा मैदानावरती योग दिनाचे औचित्य साधून योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ, पालिका आयुक्त पोलीस प्रशासन आणि मुख्य म्हणजे हजारोंच्या संख्येने पुणेकर यांच्यासह वारकरी देखील उपस्थित होते.
Yoga for One Earth, One Health…
🧘CM Devendra Fadnavis at the ‘Warkari BhaktiYog’ program on the occasion of International Yoga Day
Minister Chandrakant Patil, MoS Madhuri Misal, Prof Sadanand More and other dignitaries were present.
🧘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या… pic.twitter.com/zmyZ2HMRpw— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 21, 2025
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवस पुणे मुक्कामात आहे आणि आजच योग दिन देखील आहे.
यामुळे या दिवसाचे औचित्य साधत वारकरी भक्तीयोग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांना देखील योग साधना करता यावी योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी पुणे विद्यापीठांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.





