मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sunita Kejriwal Meets Sharad Pawar| लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणकींसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते.
शरद पवार आणि सुनीता केजरीवाल यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीमुळे आगामी विधानसभा निवडणुकी आम आदमी पक्ष महाविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र या भेटीदरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या विरोधी महाविकास आघाडी पक्षात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे. Sunita Kejriwal Meets Sharad Pawar|
लोकसभेत महाविकास आघाडीची चांगली कामगिरी
या वेळी महाराष्ट्रात विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 8, काँग्रेसला 13 आणि उद्धव ठाकरे गटाने 9 जागा जिंकल्या होत्या. विधानसभेतही त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम आदमी पक्षाचा विरोधी पक्षात समावेश केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तर काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी झाली, मात्र ती विधानसभा निवडणुकीसाठी नव्हती. विधानसभा निवडणुका हा वेगळा विषय आहे. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून मुंबईतील 36 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कारागृहात आहेत. येत्या 23 ऑगस्ट रोजी केजरीवाल यांच्या जामीन मिळण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे हरियाणा व जम्मू काश्मीरची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यादृष्टीने आम आदमी पक्ष हरियाणाच्या निवडणुकीसाठी ताकदीने उतरणार आहे. Sunita Kejriwal Meets Sharad Pawar|
हेही वाचा :
“महाविकास आघाडीत लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हेच ब्रीद”; देवेंद्र फडणविसांचा टोला





