कलम 370 ला विरोध केल्याने चिदंबरमना अटक

पाकिस्तानी खासदाराचा अजब दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे खासदार रहमान मलिक यांनी पी. चिदंबरम यांच्या अटकेचा निषेध करत कलम 370 ला विरोध केल्यानेच माजी मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई झाली. असा अजब दावा केला आहे. रहमान मलिक हे पीपीपी पक्षाचे खासदार आहेत. काश्‍मीर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठीच मोदी सरकारकडून हे सगळं घडवून आणले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीत अर्थमंत्री आणि गृहमंत्री पद सांभाळणारे पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या बातमीने मी चिंतेत आहे. मला असे वाटते की, चिदंबरम यांची फक्त एक चूक झाली ती म्हणजे त्यांनी कलम 370 हटविल्यावरून मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती असे मलिक यावेळी म्हणाले.

यावेळी रहमान मलिक यांनी केंद्र सरकार आणि आरएसएस यांच्यावर हल्लाबोल करत भारतात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून देशाच लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला उघड उघड सूट दिली आहे. चिदंबरम यांची अटक ही भारतीय राजकारणात विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचे उत्तम उदाहरण आहे. असे विधान केले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेला जो कोणी विरोध करेल त्या सर्व लोकांना त्रास देण्याचे काम केले जाते आहे. ते फक्त काश्‍मिरी लोकांना नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांनाही त्रास देत आहेत असा आरोपही रहमान मलिक यांनी केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×