‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’साठी नामांकन मिळताच छाया कदम यांनी व्यक्त केली भावना

Chhaya Kadam | मराठमोळी अभिनेत्री छाया कदम सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. जागतिक स्तरावर पोहचलेल्या छाया यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन नामांकने मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) हे पहिले नामांकन तर, दुसरा नामांकन सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर (इंग्रजी नसलेली भाषा) या श्रेणीसाठी मिळाले आहे. या श्रेणीमध्ये भारतीय दिग्दर्शकाचे नामांकन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
छाया कदमने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’चा प्रीमियर २३ मे २०२४ रोजी कान्स चित्रपट महोत्सवात झाला होता. यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. काही दिवसापूर्वी ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये (NYFCC) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
याबाबत छाया कदम म्हणाल्या की, “ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’साठी मिळालेलं गोल्डन ग्लोब नामांकन हे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहोचत आहे, याचा आनंद वाटतो. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. तो मानवी भावना, संघर्ष आणि प्रकाशाच्या शोधाबद्दल आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झालं. या नामांकनाने आम्हाला पुढे आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’मध्ये छाया कदम, कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Chhaya Kadam |





