Chhattisgarh Election : छत्तिसगड विधानसभा निवडणूक; उद्या होणार दुसऱ्या टप्प्यातील मतदान

Chhattisgarh Election : छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 च्या दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी 70 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे.
या 70 जागांपैकी 34 जागा व्हीआयपी आहेत. 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 20 जागांपैकी 10 जागा व्हीआयपी होत्या. एकूणच राज्यातील 44 जागा हायप्रोफाईल आहेत.
या जागांवर भाजप, कॉंग्रेस आणि जेसीसीजेच्या दिग्गज नेत्यांमध्ये लढत होणार आहे. भाजप, कॉंग्रेस आणि जेसीसीजेचे उमेदवार एकमेकांना कडवी टक्कर देतील.
पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला विधानसभेच्या 20 जागांवर निवडणूक झाली. त्याअंतर्गत छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील जागा आणि दुर्ग विभागातील राजनांदगाव, कावर्धा आणि खैरागड या नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील विधानसभा जागांवर निवडणूक झाली.
पहिल्या टप्प्यात एकूण 78 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी बस्तरमधील सर्व 12 जागांसह 16 जागांवर जास्त मतदान झाले आहे.
वर्ष 2018 च्या तुलनेत 4 जागांवर कमी मतदान झाले. या 4 जागांमध्ये कबीरधाम जिल्ह्यातील पंडारिया आणि कावर्धा या दोन्ही जागा, चुईखदान जिल्ह्यातील खैरागड आणि राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी या दोन्ही जागांचा समावेश आहे. यावेळी बस्तर विभागातील सर्व 12 जागांवर विक्रमी मतदान झाले.





