छत्रपती शिवाजी महाराजांचे भिवंडीत भव्य मंदिर; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

Devendra Fadnavis | छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर भिवंडी येथील मराडे पाडा या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तब्बल चार एकर जागेत उभारण्यात आलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे. गाभारा सभामंडप 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे. मंदिराभोवती 4 बुरूज आहेत. 56 फूट उंचीचं भव्य मंदिर असून मंदिराला 36 फूट उंचीचं महाद्वार आहे. चार एकर परिसरातील एक एकर क्षेत्रावर 56 फूट उंचीचे हे मंदिर गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. मंदिराचा सभामंडप परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे. Devendra Fadnavis |
‘जय भवानी, जय शिवाजी’🚩
LIVE | ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरा’चे (शक्तिपीठ) लोकार्पण
🕚 स. ११.०२ वा. | १७-३-२०२५📍भिवंडी, ठाणे.#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #Bhiwandi https://t.co/fL7umVhlq2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2025
मंदिराभोवती तटबंदी, चारही कोपर्यांवर गोलाकार बुरूज, टेहळणी मार्ग, आणि महाद्वाराची रचना करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट अखंड कृष्णशीला पाषाणातून घडविण्यात आली आहे. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर शिल्पचित्र साकारण्यात आले आहे. त्याखाली त्या प्रसंगाची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आली आहे. Devendra Fadnavis |
हेही वाचा :
“ढोंगीपणाला कोणतीही सीमा नाही”; तीन तासांच्या पॉडकास्टवरून काँग्रेसचा PM मोदींवर हल्लाबोल





