Asian Hospital Fire : छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्णांना वाचवले; कोणतीही जीवित हानी नाही
Asian Hospital Fire : शहरातील गजबजलेल्या आकाशवाणी चौकातील 'एशियन हॉस्पिटल'मध्ये शुक्रवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

Asian Hospital Fire : शहरातील आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) आग लागल्याने एकच खळबळ उडाली. (Asian Hospital Fire)
आगीच्या वेळी यामध्ये 9 बालके उपचार घेत होती. तर एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सर्व 9 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. (Asian Hospital Fire)
सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. यातील 5 बालकांना घाटी रुग्णालयात, 3 बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. (Asian Hospital Fire)
अग्निशमन दलाने अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे आग हॉस्पिटलच्या इतर भागात पसरण्याचा धोका टळला. ज्या पहिल्या मजल्यावर एनआयसीयू आहे, तिथे एकूण 58 रुग्ण उपचार घेत होते. (Asian Hospital Fire)
यामध्ये 8 बालके, जनरल विभागातील 36 आणि स्पेशल रूममधील 13 रुग्णांचा समावेश होता. माहितीनुसार, सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बचावकार्यासाठी तब्बल 30 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. (Asian Hospital Fire)
दरम्यान, अलीकडेच अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एकीकडे ही दुदैवी घटना घडली असतातानाच छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये देखील अशीच आगीची घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. (Asian Hospital Fire)
Wai MIDC Fire: वाई एमआयडीसीत अग्नितांडव! गौरी- गणपती मूर्ती कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी






