मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात छगन भुजबळ हायकोर्टात जाणार; ओबीसींसाठी देणार लढा

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह मुंबईत उपोषण केले होते. मात्र उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जरांगे यांची भेट घेत थेट जीआरच काढला. आठ प्रमुख मागण्यांपैकी जरांगे यांच्या सहा मागण्या सरकारने मान्य केल्या. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली.
भुजबळ हायकोर्टात याचिका दाखल करणार
आता मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत. याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रे जमा झाल्यानंतर छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील, अशी माहिती आहे. Chhagan Bhujbal |
समीर भुजबळ हे या कायेदशीर लढाईची जबाबदारी सांभाळणार आहेत. राज्य सरकारने विश्वासात न घेता निर्णय घेतल्याची भावना छगन भुजबळांची आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या हक्कांना धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांची आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहेत. Chhagan Bhujbal |
हेही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये ईडीचे २२ ठिकाणी छापे ; वाळू माफिया अन् व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे सुरूच





