जीवे मारण्याच्या धमकीवर भुजबळ म्हणतात,”पूर्वी सुपाऱ्या घेऊन…”

Chhagan Bhujbal On threat। राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका पत्रातून भुजबळांना तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेतलीय”अशी धमकी दिली. यावर भुजबळांनी आता प्रतिक्रिया दिलीय.
धमकीच्या पत्राविषयी दिली माहिती Chhagan Bhujbal On threat।
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांना धमकीविषयी माहिती दिली. नाशिकमधील त्यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात जीवे मारण्याची सुपारी घेण्यात आलीय. तसेच ठार मारण्याचा कट कुठे,कसा आणि त्यातील गाड्यांचे क्रमांक काय याविषयी माहिती देण्यात आल्याचे भुजबळांनी सांगितले.
पुढे भुजबळ म्हणले,“आयुष्यात मला अशी खूप धमकीची पत्रं आली. तसे प्रयत्नही झाले. पण आपण हे सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं. आता घरी तर बसू शकत नाही. आपण घेतलेली भूमिकाही बदलू शकत नाही. जे काही परिणाम व्हायचे ते होतील. आपण पोलिसांना याची सगळी माहिती पुरवलेली आहे. पोलीस या सगळ्याचा शोध घेतील.” असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा
‘मराठ्यांच्या हजामती करू नका…’ भुजबळांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
तसेच “महाराष्ट्रात अलिकडे जे प्रकार महाराष्ट्रात घडतायत, ते पाहाता आमच्या लोकांनी ताबडतोब ते पोलिसांना कळवलं आहे. मोबाईल नंबर, गाड्यांचे नंबर असं सगळं आहे त्यात. कुठे बैठक झाली, कुणाचा मोबाईल नंबर अशी बरीच माहिती पत्रात आहे”, असेही भुजबळ म्हणाले.
आपण गृहमंत्री असताना गँगवॉर आटोक्यात Chhagan Bhujbal On threat।
दरम्यान, पूर्वी सुपाऱ्या घेऊन होत असलेले गँगवॉर आपण गृहमंत्री असताना आटोक्यात आले होते, असा उल्लेख करत भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मारला.“हे धक्कादायक आहे हे खरंच आहे.
पूर्वी सुपाऱ्या घेऊन गँगवॉर व्हायचं. मी गृहमंत्री असताना ते आटोक्यात आलं होतं. पण आता ठीक आहे. जे आहे ते आहे. पोलीस त्यावर नक्कीच कारवाई करतील. ही धमकी नेमकी कशासाठी दिली, हे त्यांना पकडल्यानंतर लक्षात येईल. अशा कितीही धमक्या आल्या, प्रत्यक्षात त्या धमक्या अंमलात जरी आल्या, तरी मी माझी विचारसरणी सोडू शकत नाही”, असे भुजबळांनी म्हटले.
हेही वाचा
‘मला लाथाडायची भाषा करू लागले….’; छगन भुजबळांनी सांगितलं राजीनामा देण्यामागचं खरं कारण





