Indori News: चेतन खांदवे, पवन ढोरे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
नागरिकांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव

इंदोरी– इंदोरी परिसरातील चेतन विष्णूशेठ खांदवे आणि पवन दशरथ ढोरे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दोघांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची, कार्यातील सातत्याची आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेहनत, कर्तृत्व आणि समाजासाठी योगदान देण्याची त्यांची भूमिका यामुळे या नियुक्तीकडे परिसरात सकारात्मकतेने पाहिले जात आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, शासकीय कामकाजात आवश्यक ते सहकार्य करणे आणि समाजहिताच्या उपक्रमांना चालना देणे, अशा अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.
नव्या जबाबदारीतून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि सामाजिक कार्याचा विस्तार करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या नियुक्तीमुळे इंदोरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेतन खांदवे आणि पवन ढोरे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
‘Kalamb Pattern’: करंदीच्या सुपुत्राचा ‘कळंब पॅटर्न’ राज्यभर चर्चेत





