Chenab Bridge : जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर वाहतूक सुरु; काय आहे? पुलाची खासियत वाचा….

Chenab Bridge : जम्मू-काश्मीरच्या पहाडी क्षेत्रात आता गगनाला नवे पंख मिळणार असून आता जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या चिनाब पूलावरुन येत्या ६ जूनपासून रेल्वे वाहतूक सुरु केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी चिनाब रेल्वे पुलावरून काश्मीरला जोडणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर चिनाब रेल्वे पुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा भाग आहे’. जितेंद्र सिंह यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ६ जून रोजी या पुलावरून काश्मीरसाठी गाड्या धावण्यास सुरुवात होईल.
आता इतिहास घडणार आहे… फक्त ३ दिवस शिल्लक आहेत!
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, शक्तिशाली चिनाब पूल, जम्मू आणि काश्मीरमध्ये उभा आहे. तो उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा भाग आहे. तो निसर्गाच्या कठीण परीक्षांना तोंड देण्यासाठी बांधला गेला आहे. हा पूल म्हणजे नवीन भारताच्या ताकदीचे आणि दृष्टिकोनाचे एक गौरवशाली प्रतीक!
२००९ मध्ये, पहिला ११८ किमी (बारामुला-काझीगुंड) बांधण्यात आला. तिथे डिझेल मल्टीपल युनिट (डीएमयु) ट्रेन चालतात. हा ट्रॅक काश्मीरमध्येच येतो. त्याचा शुभारंभ ऑक्टोबर २००९ मध्ये झाला. २०१३ मध्ये, काश्मीर आणि जम्मू विभागांना जोडण्यासाठी १८ किमी (काझीगुंड-बनिहाल) ट्रेन सुरू करण्यात आली. त्यावेळी डीएमयु बनिहालपर्यंत वाढवण्यात आला.
त्यानंतर, उधमपूर ते कटरा पर्यंत २५ किमीसाठी वंदे भारतसह अनेक ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. जुलै २०१४ पासून त्याची सुरुवात झाली. २० फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदींनी ४८ किमी (बनिहार-खारी-संगलदन) रेल्वे ट्रॅकवर ट्रेनचा शुभारंभ केला.
हा ट्रॅकदेखील जम्मू विभागात आहे. आता ६३ किमी कटरा रियासी-संगलदन ट्रॅक देखील पूर्णपणे तयार आहे. ६ जूनपासून या ट्रॅकवर रेल्वेचे कामकाज सुरू होईल आणि हा प्रकल्प काश्मीरशी जोडताच पूर्ण होईल.
चिनाब पुलाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी :
१. १२५० कोटी रुपये खर्च
२. चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंच
३. पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच, लांबी १३१५ मीटर
४. चिनाब रेल्वे पूल ८ रिश्टर स्केलच्या भूकंपांना तोंड देईल
५. कोणत्याही उच्च तीव्रतेच्या स्फोटांना तोंड देईल
६. संभाव्य दहशतवादी धोके क्यांनी पूलाची हानी होणार नाही





